भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांच्या प्री वेडिंग समारंभ जामनगरमध्ये थाटात झाला. तीन दिवस चालणाऱ्या या समारंभात देश-विदेशातून दिग्गज आले होते. या समारंभासाठी प्रथमच जामनगरमध्ये १६० आंतरराष्ट्रीय विमानांमधून विदेशी पाहुणे आले होते. अन्यथा जामनगर विमानतळावर दिवसातून पाच ते दहा विमाने उडत होती. दरम्यान या समारंभाचे सर्वात महत्वाचे आकर्षण नीता अंबानी यांचा डान्स परफार्मन्स राहिला. त्यांच्या पारंपारिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्या नृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
आयपीएलमधील ‘या’ टीमच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात, स्पर्धा सुरु होण्याआधीच झटका
“या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” या मंत्राने नीता अंबानी यांच्या नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर “विश्वंभरी अखिल विश्व तनी जनेता विद्या धरी वदनमा वसजो विधाता” या भजनावर पारंपारीक भारतीय नृत्य त्यांनी केले. या समारंभाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. परंतु नीता अंबानी यांच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. काही तासांत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
#WATCH | Founder and chairperson of Reliance Foundation Nita Ambani performed at Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding celebrations in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/7XvDzbr7Qa
— ANI (@ANI) March 3, 2024
गायक दिलजीत दोसांझ यांचा नीता अंबानी यांनी गुजराती भाषेतून क्लास घेतला. नीता अंबानी सिंगर दिलजीत दोसांझ यांना विचारते,’केम चो’, तो दिलजीतने उत्तर दिले ‘माजा मां’ त्यावर प्रेक्षक चांगलेच खूश होतात. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न नीता अंबानी विचारतात. पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ यांना तो प्रश्न कळत नाही. ते सरळ मला प्रश्नाचा अर्थ समजला नाही. पुन्हा प्रश्न विचारला. हिंदीतून नीता अंबानी विचारतात, कुठे राहतात. तेव्हा दिलजीत म्हणतो, लोकांच्या ह्रदयात…त्याच्या उत्तरावर जोरदार टाळ्या पडतात.