Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य : 4 मार्च ते 10 मार्च 2024

साप्ताहिक राशिभविष्य : 4 मार्च ते 10 मार्च 2024

मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शनि यांचा त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. यातून शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्रिग्रही योग, षष्ठ राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Weekly Horoscope 04 To 10 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi )

मेष : शुभ कार्य घडेल
दिनांक ३ ,४ रोजी दोन दिवस नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे ठरवले तरीसुद्धा तसे होणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड वाढू शकते. या दोन दिवसांत उशीर होणार आहे हे गृहीत धरून चाला. त्यामुळे त्रास होणार नाही. जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला गेला तर ती गोष्ट अंगलट येऊ शकते. त्यापेक्षा ती न केलेली चांगली. बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण लाभदायक राहील. म्हणजेच या दिवसांत शुभकार्य घडेल. अनपेक्षित असे प्रस्ताव आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करावे लागेल. आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनाल.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

वृषभ : आर्थिक लाभ होईल
४ तारखेला दुपारनंतर दिनांक ५ व ९ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. यामध्ये कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. या दिवसांत कारण नसताना गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण हे गैरसमज होणार नाहीत याची मात्र दक्षता घ्या. राग हा क्षणिक असतो .त्यामुळे कोणतीही गोष्ट ताणून धरू नका. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन काहीही साध्य होणार नाही. जे चालले आहे ते ठीक समजून पुढे चला. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. या चांगल्या कालावधीमध्ये बरीच कामे पूर्ण होतील. व्यवसायात चाललेल्या घडामोडीत चांगले बदल होतील. आर्थिक लाभ होईल.

घरेलू कामगार, बांधकाम कामगार, ‘या’ सर्वांना मिळतील गृहपयोगी वस्तू आणि 5 हजार रुपये : शासनाचा नवीन GR वाचा आत्ताच

मिथुन : जमेल तेवढेच करा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे प्रमाण होत आहे. त्यामुळे सध्या दिवस चांगले नाहीत असे धरून चाला. कोणत्याही नवीन गोष्टीचा शुभारंभ सध्या न केलेला चांगला. त्यासाठी थोडासा वेळ द्या. हे दिवस काही कायमस्वरूपीचे नाहीत. पण थोड्या दिवसांनी का होईना चांगले दिवस येणार आहेत. चांगल्या दिवसांची वाट पाहा. काम करताना निराशाजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र एक लक्षात ठेवा, जमेल तेवढेच करा. पण प्रयत्न सोडू नका. व्यवसायात नफा नाही मिळाला तरी चालेल, पण तोटा होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदारवर्गाने वरिष्ठांच्या कामकाजात ढवळाढवळ करू नका. आर्थिकदृष्ट्या बचतीकडे लक्ष द्या. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबातील मतभेद दूर ठेवा. जोडीदाराचा आदर करा. मानसिक शारीरिक ताण घेऊ नका.

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

कर्क : घाई करू नका
सप्ताहात चंद्रग्रहाचे भ्रमण अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीत एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. सर्व दिवसांचा कालावधी काळजीपूर्वक हाताळावा लागेल. मी म्हणेल तीच पूर्व दिशा असे होणार नाही. इतरांनी काय करावे आणि काय करू नये याचा सल्ला देत बसू नका. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. त्यामुळे त्रास होणार नाही. सध्याचे दिवस बेताचे आहेत हे लक्षात ठेवा. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढता राहील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. समाजसेवा करण्याचा मोह सध्या बाजूला ठेवा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. जोडीदारांशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य जपा.

300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy

सिंह : वायफळ खर्च टाळा
दिनांक ७, ८ या दोन दिवसांत आळशी वृत्ती राहील. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. विनाकारण दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करावासा वाटेल. आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टींमध्ये पुढाकार घ्याल आणि स्वत:हूनच स्वत:च्या अडचणी वाढवाल. त्यामुळे या दोन दिवसांत कोणाच्याही भानगडीत पडू नका. नियमबाह्य गोष्टी टाळा. कोर्ट-कचेरी या गोष्टींपासून लांब राहा. रागाच्या भरात केलेली कोणतीही गोष्ट नुकसानीची ठरू शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिक भरभराट होईल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. वायफळ खर्च टाळा. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संततीसौख्य लाभेल. घरगुती वातावरण ठीक राहील. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वत:चे आरोग्य जपा

कन्या : अपेक्षित प्रस्ताव येतील
दिनांक, ९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगले दिवस म्हणजे तुमच्यासाठी सुगीचे दिवस आहेत असे म्हणायला हरकत नाही. म्हणजेच या दिवसात ज्या गोष्टींना हात घालाल त्या गोष्टी पूर्णत्वाला जातील. चांगल्या कालावधीमध्ये अपेक्षित असे प्रस्ताव येतील. बऱ्याच दिवसांतून कामे मार्गी लागल्याचे समाधान होईल. व्यवसायात अनेक मार्गांतून आलेली संधी उत्पन्न वाढवणारी आहे. नोकरदारवर्गाला कामांमध्ये जो बदल स्वीकारताना त्रास होत होता तो आता होणार नाही. आर्थिक बाबतीत योग्य असे नियोजन केले तर अडचण येणार नाही. राजकीय क्षेत्रात काम करण्याचा उत्साह वाढेल. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे वेळीच लक्ष द्या. स्थावर मालमत्तेचा प्रश्न निकालात निघेल. मानसिक ताण तणाव कमी होईल. आरोग्य उत्तम राहील.

मुलाच्या प्री वेडिंग नीता अंबानी यांचा कल्चरल डान्स : VIDEO पहा

तूळ : अनुकूलता वाढेल
शुभ ग्रहांची साथ उत्तम मिळेल. कोणताही संघर्ष न करता काम पूर्ण होईल. अनुकूलता वाढेल. वातावरण चांगले असेल. ज्या वेळी सप्ताहात असे वातावरण असते त्या वेळी कामाचे वेळापत्रक ठरवा व वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करून कामकाज चालू करा. त्यामुळे कामकाजाला गती येईल. विनाकारण वाया जाणारा वेळ वाचेल. इतरांच्या मार्गदर्शनाची मदत मिळेल. सकारात्मक गोष्टी घडू लागतील. सर्व दिवस चांगले जातील. व्यवसायात आतापर्यंत जी धरसोड वृत्ती होती ती होणार नाही.
नोकरदारवर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करताना जास्तीचा वेळ द्यावा लागेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात स्पष्ट भूमिका सध्या तरी टाळा. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांशी संपर्क साधाल. घरगुती वातावरण चांगले असताना होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. आरोग्य चांगले राहील.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना

वृश्चिक : योग्य मोबदला मिळेल
दिनांक ३, ४ हे दोन दिवस कितीही शांत राहण्याचे ठरवले तरी परिस्थिती अशी निर्माण होईल की, तुमचा रागाचा पारा चढेल. तुम्ही काय बोलता व काय बोलत नाही याचे भान तुम्हाला राहणार नाही. असे ज्या वेळी वातावरण असते त्या वेळी कोणत्याही प्रतिक्रिया न देणे केव्हाही चांगले. त्यामुळे त्रास होणार नाही. इतरांनी वेळेत काम करावे ही अपेक्षा तर सोडूनच द्या. असेच हे वातावरण आहे. तेव्हा स्वत:वर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पूर्ण करताना संयम ठेवा. नोकरदारवर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घातल्यास कामाचा व्याप वाढेल.

धनू : स्वत:वर नियंत्रण ठेवा
दिनांक २ रोजीचा एकच दिवस अनुकूल नाही. बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये एक प्रकारची हुरहुरी लागली होती , ती हुरहुरी आता दूर होणार आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना उत्साह टिकून राहील. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे आहे अशी विचारसरणी तुमच्या मनामध्ये नेहमीच येते ती सध्या मात्र खरी होणार आहे. व्यवसायिक दृष्टय़ा भागीदारी व्यवसायासाठी येणारे प्रस्ताव चांगले असतील. नोकरदार वर्गाला कामामध्ये सुवर्णसंधी मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक घडेल. मुलांची साथ मिळेल. नातेवाईकांशी संपर्क साधावा लागेल. आरोग्य ठणठणीत राहील.

येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?

मकर : शब्द जपून वापरा
४ तारखेला दुपारनंतर व दिनांक ५, ६ हे दोन संपूर्ण दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा घालवता येईल तेच पाहा. कारण या दिवसांत तुमची होणारी चलबिचल अवस्था ही चांगल्या कामाची घडी विस्कळीत करणारी आहे. या दिवसांत कोणतेही नियोजन न करता काम केल्यास नुकसान होऊ शकते. तुमचा बोलण्याचा हेतू वाईट नसला तरी तो समोरच्याला वाईट वाटण्यासारखा आहे. त्यामुळे इतरांशी बोलताना शब्द जपून वापरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी धीर धरावा लागेल.
नोकरदारवर्गाला कामकाज सुरळीत चालण्यासाठी कष्ट वाढवावे लागतील. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळा. कुटुंबात असणारे मतभेद वेळीच दूर करा. मानसिकता जपा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : आठवणी जाग्या होतील
दिनांक ७, ८ या दोन दिवसांत कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण कोणतेही असो तुमचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. तेव्हा हे गैरसमजाचे वादळ टोकाचे अंतर गाठणार नाही यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीवर भडक प्रतिक्रिया देणे म्हणजे नुकसान ओढवून घेतल्यासारखे आहे. तेव्हा शांतपणाने निर्णय घ्यायला शिका. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वत:चीच बाजू खरी करण्याचा अट्टहास सोडा. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्ट्या भांडवलात वाढ कराल. ही गोष्ट आगामी काळासाठी फायद्याची ठरेल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभ होईल.

LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)

मीन : सप्ताह लाभदायक
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण या सप्ताहात अतिशय लाभदायक ठरेल. प्रत्येक वेळी मनामध्ये कोणती ना कोणती तरी खंत असायची. सध्या मनामध्ये खंत वाटण्यासारखी गोष्टच होणार नाही. आनंदाच्या गोष्टी समोर आल्यामुळे समाधानाची परिस्थिती निर्माण होईल. स्वत:च्या कामकाजाची जबाबदारी इतरांवर देणे तुम्हाला आवडणार नाही. तुमचे काम तुम्ही स्वत: कराल. त्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. व्यवसायात नवनवीन योजना राबवण्यासाठी जे आराखडे तयार केले आहेत ते सध्या पूर्ण होतील. नोकरदारवर्गाला नोकरीमध्ये नवीन संधी मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. भावंडांना मदत कराल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -