Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीकोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी मिळणार?; संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलं

कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी मिळणार?; संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलं

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात कोल्हापुरातील जागा महाविकास आघाडीकडून कोण लढवणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शाहू महाराज हे या जागेवरून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशीही चर्चा होतेय.

यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला शाहू महाराज यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विचारावा लागेल. विनंती करावी लागेल की, ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यत आहे का?, असं संजय राऊत म्हणाले.संजय राऊत म्हणाले…

कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागावरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे. शाहू महाराज यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता. शाहू महाराज यांची लोकसभेची जागेसाठी लढण्याची चर्चा अद्याप आमच्यासोबत झाली नाही. काँग्रेसने काय सांगितले आहे मला माहित नाही, असं संजय राऊत म्हणाले.

 

“मी स्वत: त्यांच्याशी चर्चा करेन”

छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो. त्यांचा प्रचंड मान आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की, शिवसेनेच्या उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडी मध्ये यावं. आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये. 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना जागा लढवीत आहे. शाहू महाराज यांच्याशी मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंद आहे महाराष्ट्र उजळून निघेल, असं संजय राऊत म्हणाले.वंचित मविआत येणार?

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार असल्याची चर्चा आहे. तशी चर्चा सध्या या चार पक्षांमध्ये सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते. नेत्यांचा यांचाही आग्रह असतो. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. कोणती मागणी केली असेल तर नक्की चर्चा होते. आता प्रकाश आंबेडकर यांची यादी आली आहे. त्यांची देखील इच्छा आहे. यावर लवकरच चर्चा होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -