येत्या २२ मार्चपासून आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे (masterplan). वर्षभर क्रिकेटपटू आणि फॅन्स या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान या स्पर्धेच्या आयोजनाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार दरवर्षी दोन वेळेस आयपीएल स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
आयपीएल ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी भारतीय संघाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी एकाच वर्षात २ आयपीएल स्पर्धा खेळवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, स्पर्धेची लोकप्रियता पाहता या स्पर्धेचे आयोजन वर्षातून दोनदा केलं गेलं पाहिजे.
दोन वेळेस आयपीएल स्पर्धेचं (masterplan) आयोजन करणं मुळीच सोपं नाही. कारण बीसीसीआयला वेगळ्या विंडोची गरज लागेल. आयपीएल ही २ महिने चालणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभाग घेत असतात.
ज्यावेळी ही स्पर्धा खेळली जाते त्यावेळी कुठलीही द्विपक्षीय मालिका आणि आयसीसीची स्पर्धा सुरु नसते. याबाबत बोलताना आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ म्हणाले की,’ आम्हाला ८४ सामन्यांसाठी आणि त्यानंतर ९४ सामन्यांसाठी वेगळी विंडो शोधण्याची गरज आहे.एकाच वर्षात २ आयपीएल स्पर्धा खेळवणं मुळीच सोपं नाही. त्यासाठी बीसीसीआयला टी-२० ऐवजी टी-१० लीग खेळवावी लागेल. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त सामने खेळवता येतील. मात्र अरुण धुमाळ यांनी याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही. अरुण धुमाळ यांनी असे म्हटले आहे की, जो काही निर्णय घेण्यात येईल तो खेळाच्या हिताचा निर्णय असेल.
आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.