टीम इंडियाचा (india national cricket team) स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय. डोळे बंद करून वनडे वर्ल्ड कपमधील आठवणी उजागर केल्या की एक चेहरा हमखास समोर येतो, तो मोहम्मद शमी… आपल्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या मोडणाऱ्या शमीचं घातक मारा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.अशातच आता मोहम्मद शमी आगामी (india national cricket team) टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीला सर्जरीला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर शमी आयपीएलमधून बाहेर पडला अशातच आता कॅप्टन रोहित शर्माला टेन्शन देणारी बातमी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिली आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे.
अशातच आता या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. मोहम्मद शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो आयपीएलच नाही तर वर्ल्ड कप देखील खेळणार नसल्याचं जय शहा यांनी माध्यमांनासांगितलंय.
काय म्हणाले जय शहा?
शमीवर शस्त्रक्रिया झाली, तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मोहम्मद शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका ही सप्टेंबर 2024 मध्ये खेळवली जाणार आहे.
ऋषभ पंत भारतासाठी टी-20 विश्वचषक खेळू शकला तर ती मोठी गोष्ट असेल. तो एक हुकमी एक्का आहे. जर तो खेळण्यावर नियंत्रण ठेवू शकला तर तो विश्वचषक खेळू शकतो, आयपीएलमध्ये तो कसा कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, मला बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता. त्यामुळे शमी वर्ल्ड कप नक्की खेळेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, आता टीम इंडियाला जोर का झटका बसला आहे.
जखमी असताना वनडे वर्ल्ड कप खेळला
वनडे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीला घोट्याचा त्रास होत होता. वर्ल्ड कपपासून शमीला यासाठी उपचारांची गरज होती. मात्र, त्याने देशासाठी खेळायला प्राधान्य दिलं. मोहम्मद शमी घोट्याच्या समस्येवर उपचारासाठी मुंबईतील ‘स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक’चा सल्ला घेत होता, अशी माहिती देखील आता समोर आली होती.