लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना देशवासियांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात मोठी आणि महत्त्वाची घोषणा करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याव्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्यावर मोठी घोषणा करू शकतात. दरम्यान, केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा करु शकते अशी चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत पारित करून पाच वर्षे झाली आहे.
आता लोकसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार असल्याचे म्हटले जात आहे. मोदी मोठी घोषणा करू शकतात, अशी बातमी समोर येताच सोशल मीडियावर युजर्सच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही नेटकऱ्यांनी असे म्हटले की, CAA संदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. तर काही जण म्हणाले, पंतप्रधान मोदी किमान आधारभूत किंमत (MSP) संदर्भात मोठी घोषणा करू शकतात. मात्र, या सर्व गोष्टी केवळ तर्क वितर्कांवर सुरू आहे.