राहुल गांधी यांचा सर्वात गंभीर आरोप, मोदींनी देशा
काग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये पोहोचली आहे. राहुल गांधी नंदुरबारमध्ये पोहोचले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. यानंतर राहुल गांधी यांची नंदुरबारमधील सीबी मैदानावर सभा पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 20 ते 22 अब्जाधीशांचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तानच्या सर्वात मोठ्या 20 ते 25 अब्जावधीशांचे किती कोटींचे कर्ज माफ केले माहीत आहे का? 16 लाख कोटी रुपये. मला आता सांगा. नरेंद्र मोदींनी आदिवासींचं किती कर्ज माफ केलं आहे? आदिवासी शेतकऱ्यांचा एक रुपया माफ केला आहे का? विद्यार्थ्याचा कर्ज माफ केलं? नाही. पण ज्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.“16 लाख कोटी हा एवढा मोठा आकडा आहे की, आपल्यासारख्याला समजणार नाही. पण अदाणीला समजेल. नरेंद्र मोदींनी 24 वर्षांचा मनरेगाच्या पैशांची कर्जमाफी केली आहे. तुम्ही हिंदुस्तानच्या वर्षाच्या मनरेगाचा पैशांचा हिशोब केला तर 65 हजार कोटी होतात. 24 वर्षांचे पैसे, मोदींनी 20-25 अब्जावधीशींचं कर्ज माफ केलं आहे. हिंदुस्तानचे 22 लोकं आहेत, त्यामध्ये अदाणी, अंबानी, नाव आपल्याला माहिती आहे. त्यांच्याकडे तितकच धन आहे जितकं देशाच्या 70 कोटी नागरिकांकडे आहे. दुसरीकडे 22 लोक. त्यांच्याकडे विमानतळ, पोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, मोबाईल फोन, डिफेन्स इंडस्ट्री, संपूर्ण त्यांच्या हातात आहे. त्यांच्यासाठी सारं काही केलं जातं आणि उर्वरित हिंदुस्तान बघत आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
‘तुम्ही ओरिजनल मालक आहात’
“तुम्ही आदिवासी आहात की वनवासी आहात? आदिवासीचा अर्थ काय? आदिवासी या देशाचा मालक आहे. आदिवासी शब्दाचा अर्थ देशाचे खरे मालक. इथे जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा आदिवासी हिंदुस्थानात होते. तुम्ही ओरिजनल मालक आहात. हिंदुस्तानच्या धनाचे ओरिजनल मालक तुम्ही होते. वनवासी म्हणजे ते लोक जे जंगलात राहतात. वनवासी आणि आदिवासींमध्ये फरक आहे. आदिवासी शब्दासोबत जमीन, जंगल आणि पाणीचा अधिकार जोडला गेला. वनवासी शब्दात कोणताच अधिकार नाही. त्यामुळे भाजप तुम्हाला वनवासी म्हणते आणि आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो”, असं राहुल गांधी म्हणाले.‘आदिवासींचा जल, जंगल, जमीनवर हक्क’
“भारताचं जे आधारकार्ड आहे, ज्याने देशाच्या प्रत्येक नागरिकाला ओळख मिळते, त्याला आम्ही इथे का लागू केलं? आदिवासी जिल्ह्यात का लागू केलं? कारण आम्ही मेसेज देऊ इच्छित होतो की, तुम्ही देशाचे ओरिजनल मालक आहात. जल, जंगल आणि जमीन तुमचं होतं, तुमच्याकडून ते घेतलं गेलं. तुमचं ते होतं तर मग जमिनीवर, जल आणि जंगलवर तुमचा हक्क आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.वनवासी म्हणजे एकदा हिंदुस्तानात जंगल संपले की आदिवासी कुठलेच राहणार नाहीत. भाजप तुम्हाला वनवासी म्हणते आणि जंगल संपवत चालली आहे. अदानीला जंगल देत चालली आहे. हळूहळू सर्व जल, जंगल, जमीन अदानीसारख्या अब्जावधींना दिला जाईल. त्यानंतर भाजप तुम्हाला म्हणेल, तुम्ही वनवासी आहात, वन तर आता राहीलं नाही. आता जावून तुम्ही रस्त्यावर भीक मागा किंवा मजुरी करा. देश तुमचा नाही”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.