Wednesday, December 4, 2024
Homeअध्यात्मस्वामींच्या 'या' चार मंत्राची एक माळ रोज जप केल्याने, स्वामींचा अनुभव येतो:...

स्वामींच्या ‘या’ चार मंत्राची एक माळ रोज जप केल्याने, स्वामींचा अनुभव येतो: सर्व इच्छा पूर्ण होतात..!

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते की, ते आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. आपल्यावर नेहमी त्यांचे कृपा टिकून राहते. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते. कोणतीही संकटे आपल्यावर ओढून येत नाही.

स्वामींची कृपा आपल्या व्हावी म्हणून पारायण, मंत्र जाप, श्लोक, ग्रंथ पठण अशा अनेक प्रकार आहेत स्वामींची सेवा करत असतात. तिच्यामुळे त्यांना स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळते. म्हणूनच आज आपण काही असे मंत्र पाहणार आहोत की, ज्यामुळे स्वामींची सेवा करण्याचे भाग्य तर आपल्याला मिळतेच त्याबद्दल स्वामींची कृपा देखील आपल्यावर होते.

आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाही. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येऊ शकते. घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. ते चार मंत्र कोणते व त्याचे पठण कसे करावे? याची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आपण दररोज सकाळी व संध्याकाळच्या वेळेस देवाची पूजा करीत असतो. त्याचवेळी आपण या मंत्राचे जप केली तरी देखील चालू शकते. या दोन्ही वेळेस जर आपल्याला शक्य असेल तर, आपण जप करू शकतो. पण शक्य नसेल तर, आपण कोणत्याही एका वेळेस या मंत्राचा जप जरूर करावा.

स्वामींचे हे चार मंत्र आहेत की ज्याचा जप आपल्याला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर अगरबत्ती लावून प्रत्येकी एक एक माळ असा हा जप करावा. त्यामुळे नक्कीच आपला घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. घरामध्ये सुख आणि समाधान होईल.

|| ॐ दिंगबराय नमः ||
|| ॐ आजानुबाहवे नमः ॥
|| श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ॥

असे हे चार मंत्र आहेत की, ज्यांचा जप आपल्याला प्रत्येकी एक एक माळ करायचा आहे. आपण इतर कोणत्याही देवाची पूजा किंवा स्त्रोत म्हणत असु तर त्याबरोबरच आपण या मंत्राचा देखील जप केला तर, नक्कीच आपल्याला स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर होईल.

अशाप्रकारे या चार मंत्राचा जप तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी प्रत्येकी एक एक माळ इतका करा. नक्कीच तुमच्यावर स्वामींची कृपा होईल व स्वामींची सेवा केल्याचे भाग्य तुम्हाला मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -