Saturday, July 26, 2025
Homeक्रीडाटी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं भारतात आयोजन, अशा प्रकारे ठरणार 20 संघ पात्र;...

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं भारतात आयोजन, अशा प्रकारे ठरणार 20 संघ पात्र; जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. असं सर्व असताना 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. एकूण 20 संघ कसे क्वालिफाय ठरणार जाणून घ्या.टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. या वर्षापासून एकूण 20 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या स्पर्धेचं आयोजन केलं असून 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. आयसीसीने या स्पर्धेची पूर्ण तयारी केली आहे. तसेच काही नियमांमुळे ही स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. असं असताना आयसीसीने पुढच्या टी20 वर्ल्डकपची तयारी सुरु केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2026 या वर्षी असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका हे दोन देश मिळून करणार आहेत. या स्पर्धेसाठी 20 संघ कसे पात्र ठरणार याचं गणित आयसीसीने आताच ठरवलं आहे.

चला जाणून घेऊयात पुढच्या टी20 वर्ल्डकपसाठी संघ कसे पात्र ठरणार ते..टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. यात 12 संघ हे रँकिंगद्वारे आणि वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील टॉप 8 संघ थेट 2026 टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार आहेत. तर दोन ते चार संघ हे आयसीसी रँकिंगच्या आधारावर आपली जागा निश्चित करतील. भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन होणार असल्याने हे दोन संघ आधीच पात्र ठरतील.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या टॉप 8 संघात भारत आणि श्रीलंका हे संघ नसले तरी थेट एन्ट्री मिळणार आहे. टॉप 8 संघानंतर उर्वरित चार संघात भारत श्रीलंका या संघांची नाव असतील. त्यानंतर उरलेले दोन संघ रँकिंगच्या आधारावर ठरवले जातील. जर भारत आणि श्रीलंका या संघांनी टॉप 8 मध्ये जागा मिळवली तर मात्र इतर चार संघ रँकिंगच्या आधारावर पात्र ठरतील. तर उर्वरित 8 संघ हे प्रादेशिक पात्रतेच्या आधारावर ठरवले जातील.2024 वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले 20 संघ

अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी (पीएनजी), स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युगांडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) ) आणि वेस्ट इंडिज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -