यड्राव ‘येथील वस्त्रोद्योजक व्यावसायिकाची १ कोटी २५ लाख ७७ हजार ३४७ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी मुंबईतून एकास अटक केली आहे. धवल किरण शहा (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे. तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे.
शहापूर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित तोतया केंद्रीय भांडार गोवा प्रभारी अधिकारी श्रीमती वैशाली मांजरेकर या पसार आहेत. अशी माहिती तपास आधिकारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.
या दोघांनी केंद्रीय भांडार गोवा सरकारच्या लेटरहेडचा व कार्यालयाचा गैरवापर करून संतोष जनगोंडा पाटील यांची फसवणूक केली होती. अवघ्या काही दिवसातच एका संशयितास अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.