Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : बँकेच्या फसवणूक प्रकरणी माजी नगराध्यक्षांवर गुन्हा.

इचलकरंजी : बँकेच्या फसवणूक प्रकरणी माजी नगराध्यक्षांवर गुन्हा.

बँकेकडे तारण ठेवलेली मशिनरी बँकेच्या परवानगीविना परस्पर अन्यत्र हलवून फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष राजाराम शंकर धारवट यांच्यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सौ. शोभा राजाराम धारवट, रोहन राजाराम धारवट व स्नेहल रोहन धारवट यांचा समावेश आहे. या प्रकरणी सन्मती सहकारी बँकेच्या वर्धमान चौक शाखाधिकारी संदीप बळवंत घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजाराम धारवट यांनी सन्मती सहकारी बँकेकडून व्यवसाय वाढीसाठी म्हणून ४५ लाख रुपये किंमतीचे ९ फुल्ल ऑटो एअरजेटलूम, १८ लाखाचे ६ फुल्ल ऑटो एअरजेटलूम, ६ लाखाचे २ कॉम्प्रेसर व ११ लाखाचे बीम, सूत, तागे आदी ८० लाखाची विविध मशिनरी तारण दिली होती. ही सर्व मशिनरी धारवट यांनी बँकेच्या परवानगीशिवाय परस्पर कर्ज बुडविण्याच्या इराद्याने अन्यत्र हलवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापनाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

त्यानुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार तपासाचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले होते. तपासती धारवट कुटुंबियांनी बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -