Sunday, September 8, 2024
Homeक्रीडा“माझ्या पोटात गोळा…”, सनसनाटी विजयानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

“माझ्या पोटात गोळा…”, सनसनाटी विजयानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पहिला डबल हेडर 23 मार्च रोजी पार पडला. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं. तर केकेआरने दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 4 धावांनी सनासनाटी विजय मिळवला. हैदराबादला 209 धावांचा पाठलाग करताना 20 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज होती. कॅप्टन श्रेयस अय्यर याने युवा गोलदांज हर्षित राणा याच्यावर विश्वास दाखवत त्याला 20 वी ओव्हर टाकायला दिली.

हर्षितने कॅप्टनचा विश्वास खरा ठरवला आणि 13 धावांचा बचाव करत केकेआरला 4 धावांनी विजय मिळवून दिला. केकेआरने अशाप्रकारे सनसनाटी पद्धतीने पहिला सामना जिंकला. विजयानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर याने विविध मुद्दयांवर प्रतिक्रिया दिली.श्रेयस काय म्हणाला?

“माझ्या पोटात भीतीचा गोळा होता. शेवटच्या ओव्हरमध्ये काहीही होऊ शकतं असं वाटलं. हैदराबादला विजयासाठी 13 धावा पाहिजे होत्या. आमच्याकडे अनुभवी बॉलर नव्हता. पण माझा हर्षितवर विश्वास होता. काहीही झालं तरी काही फरक पडत नाही, असं मी त्याला म्हटलं.” असं श्रेयस विजयानंतर हर्षितला काय म्हणाला हे त्याने सांगितलं. हर्षितने हेनरिक क्लासेन या सेट फलंदाजाला 20 व्या ओव्हरमध्ये आऊट करत सामना पूर्णपणे केकेआरच्या बाजूने झुकवला. त्यामुळेस हर्षितचं कौतुक होत आहे. हर्षितने केकेआरसाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

 

श्रेयस विजयाबाबत काय म्हणाला?

“तुम्ही विजयाने सुरुवात करता तेव्हा नेहमीच प्रेरणा मिळते. क्रिकेटमधून खूप काही शिकायला मिळतं. या मैदानातून खूप काही शिकू शकतो”, असं श्रेयसने म्हटलं. तसेच फिल्डिंगमध्ये सुधारणा करायला हव्यात असंही श्रेयसने मान्य केलं.सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

 

कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -