राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रभाव पाहायला मिळाला. विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकुमत राखली, मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरली आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक ९ , काँग्रेस ५ , भाजप ४, शिवसेना ३ असा निकाल लागला.