ताजी बातमी /ऑनलाइन टीम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यांना पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांना दोन वेळा जाऊन भेटून आले. यावरून खासदार शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या इतर पक्षांना सोडून फक्त शिवसेनेलाच महत्त्व देत आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हे देखील घटक पक्ष असताना शेट्टी यांच्याकडून काहीच विचारणा होत नाही त्यामुळे त्यांना आमची काही गरज दिसत नाही. त्यामुळे आपल्या पक्षांची फरपट कशाला करून घ्यायची अशा नाराजीच्या स्वरात येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते व आमदार सतीश पाटील यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
नुकताच इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची भेट आमदार सतीश पाटील यांनी घेतली यावेळी मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा करून या विभागात इंडिया गाडीची ताकद किती पर्यंत असेल यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून फक्त शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी दर्शविल्याचे समजते या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीतून शेट्टी यांच्या संभाव्य उमेदवारीला इचलकरंजीतून उघडपणे विरोध असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी इंडिया गाडी कडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा असे आवाहन देखील करण्यात आले.