तुमच्याकडे जर गॅस असेल तर तुम्हाला सबसिडी मिळवण्यासाठी केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर तुम्ही केवायसी केली नाही तर मात्र तुमची सबसिडी बंद होणार आहे, कारण गॅस सिलेंडर वरती सबसिडी 300 रुपये एवढी सबसिडी दिली जाते परंतु जर ग्राहकांनी ई केवायसी केली नाही तर मात्र सबसिडी पासून वंचित राहावे लागेल.HP सिलेंडर वाल्यांसाठी केवयसी खालिल प्रोसेस नुसार करावी लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे.
त्यानंतर सिलेंडरच्या कंपन्या वेगवेगळ्या दाखवल्या जातील त्यापैकी तुमची गॅस सिलेंडरची कंपनी कोणती आहे ते सिलेक्ट करा.
ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर साइन इन या ऑप्शन वर क्लिक करून, सतरंगी एलपीजी क्रमांक टाकावा लागेल.
त्यानंतर पुढील बॉक्समध्ये कॅपच्या कोड देण्यात येईल तो कॅप्चा कोड एंटर करावा. त्यानंतर प्रोसेस बटन वर क्लिक करा.
त्यानंतर जनरेट ओटीपी वर क्लिक करा, ओटीपी बॉक्स मध्ये प्रविष्ट करा. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होईल.
इतर कंपनीच्या गॅस सिलेंडर साठी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन केवायसी करावी लागेल.