विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मालमत्ता 21 कोटींवर आहे.
महाडिक यांच्याकडे 1 लाख 64 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. 6 लाख 37 हजारांच्या ठेवी तसेच 79 लाखांचे शेअर्स तसेच पोस्ट, एनएसएस आदी ठिकाणी 18 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.