Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : पंचगंगा घाटावर आढळला मृतदेह

इचलकरंजी : पंचगंगा घाटावर आढळला मृतदेह

 

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीकाठावरील रेणुका मंदिरजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. अंदाजे ४५ वर्षे वयाच्या या मृतदेहाच्या तोंडाचे भटकी कुत्री लचके तोडत होते. ही माहिती मिळताच माणुसकी फाडेशनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवून मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पंचगंगा नदीकाठावर पुरूष जातीचा बेवारस मृतदेह पडला असल्याची माहिती माणुसकी फाडेशनचे कार्यकर्ते इम्रान शेख यांना मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेला. त्याची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -