ताजी बातमी ऑनलाइन टीम
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपक्ष उमेदवार संजय भिकाजी मागाडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना द्यावयाच्या दहा सूचक नावांपैकी पाच नावांच्या समोर बोगस सह्या केल्याचे समोर आले आहे.
या पाचही जणांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहल रेखावार यांच्याकडे आणि जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहे.