Saturday, July 13, 2024
Homeमनोरंजनकरिश्मा – करीना कपूर यांचं पाकिस्तान कनेक्शन

करिश्मा – करीना कपूर यांचं पाकिस्तान कनेक्शन

कपूर कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब. आजही कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. कपूर कुटुंबातील प्रत्येक जण प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. राज कपूर यांच्यापासून सुरु झालेली वाटचाल आता पुढील पिढ्या पुढे चालवत आहेत. कपूर कुटुंबाने इंडस्ट्रीला अनेक स्टार दिले आहेत.

कुटुंबातील प्रत्येकाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, कपूर कुटुंबाचं पाकिस्तान सोबत खास कनेक्शन आहे. रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, ऋषी कपूर यांचा वारसा पाकिस्तनशी संबंधीत आहे.

सांगायचं झालं तर, पृथ्वीराज कपूर फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पहिले कपूर होते. त्यांचा जन्म 1906 मध्ये झाला होता. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पेशावर याठिकाणी गेले होते. तेथे राज कपूर यांचा जन्म झाला. आता हे शहर पाकिस्तान येथील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे.

पाकिस्तान देशासोबत खास कनेक्शन असलेलं कपूर कुटुंब आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. एक काळ असा होता जेव्हा करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, करीना आज देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. लग्न आणि आई झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा निरोप घेतला. पण करीना हिने काम बंद केलं नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील करीना इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

अभिनेता रणबीर कपूर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. नुकतात रणबीर Animal सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने दमदार कमाई केली. आता करिश्मा कपूर हिची लेक समायरा कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर कपूर कुटुंबातील कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -