Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रUPI च्या माध्यमातून अशी करा रोख रक्कम जमा; सोपी आहे प्रक्रिया

UPI च्या माध्यमातून अशी करा रोख रक्कम जमा; सोपी आहे प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेने लवकरच युपीआयच्या मदतीने (Unified Payment Interface-UPI) रोख रक्कम जमा करण्याच्या सुविधेची घोषणा केली. ग्राहकांना युपीआयद्वारे कॅश डिपॉझिट मशीनवर झटपट पैसा जमा करता येणार आहे. त्यासाठी डेबिट कार्डची गरज भासणार नाही. पीपीआय ते युपीआय दरम्यान व्यवहारासाठी पीपीआय कार्डचा वापर होतो. पण या त्यासाठी मोबाईल ॲप अथवा संबंधित संकेतस्थळाचा उपयोग करावा लागतो. आता पीपीआय -युपीआयच्या व्यवहार सुलभीकरणासाठी मंजुरीचा प्रस्ताव आरबीआयसमोर आहे.केव्हा सुरु होणार ही सुविधा

 

कॅश डिपॉझिट मशीनमधअये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा आरबीआय केव्हा सुरु करणार याची माहिती दिलेली नाही. त्यांनी सध्या घोषणा केली. याविषयीची सुविधा कधी सुरु होणार, याची निश्चित तारीख गव्हर्नर यांनी दिली नाही.

 

या पद्धतीने युपीआयद्वारे पैसा जमा करु शकता

 

कॅश डिपॉझिट मशीन असलेले एटीएम/ बँक शाखा गाठा

त्यानंतर एटीएममध्ये युपीआय नगद, रोख रक्कम जमा करण्याचा पर्याय निवडा

जेवढी रक्कम सोबत जमा करण्यासाठी आणली असेल, ती नोंदवा

तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल

तुमच्या मोबाईलवरील युपीआय ॲपमधून सीडीएमवरील क्युआर कोड स्कॅन करा

आता तुम्ही मशीनमध्ये ठेवलेल्या नोटा मोजून त्याची नोंद घेतली जाईल

व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होईल. मशीनसोबतच युपीआय ॲपवर पैसा जमा झाल्याची नोंद होईल

सध्या डेबिट कार्डचा वापर गरजेचा

 

सध्या रोख रक्कम जमा करण्यासाठी मशीनमध्ये पैसा जमा करण्यासाठी डेबिट कार्डचा उपयोग करणे आवश्यक आहे. आरबीआयनुसार, UPI च्या माध्यमातून बँकांमधील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख रक्कम जमा करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या अनेक ठिकाणी डेबिट कार्डचा वापर करुन ही रक्कम जमा करता येते.

 

सरकारी योजनेत गुंतवणुकीसाठी ॲप

 

आरबीआय गव्हर्नर यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आरबीआय सरकारी योजनांमध्ये लोकांना थेट गुंतवणूक करता यावी यासाठी एक ॲप लाँच करणार आहे. त्यामध्यमातून सरकारी योजनांमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. सध्या आरबीआयच्या पोर्टलवर सरकारी सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक खाते उघडू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -