शहरातील बड्या व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करून वर्षभरात दीड कोटीला लुटणार्या सराईत टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलेे. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी लोटांगण घालत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. टोळीचा म्होरक्या अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. शोधासाठी पोलिसांनी पहाटे काही ठिकाणी छापे टाकले.
जिल्ह्यातील दहा ते बारा व्यावसायिकांची लुबाडणूक
लॉकडाऊन काळात संघटित टोळ्यांनी काही धनिकांसह वेगवेगळ्या घटकांतील मंडळींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा धडाकाच लावला आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या प्राथमिक चौकशीत गुन्हेगारी टोळ्यांनी शहरासह ग्रामीण भागातील दहा ते बारा बड्या व्यावसायिकांसह कॉलेज तरुणांना लाखो रुपयांना लुटल्याची माहिती पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.