ताजी बातमी ऑनलाइन टीम
आवळा आरोग्य, त्वचा आणि केस यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे आणि ताजे आवळे बाजारामध्ये मिळतात. मात्र, काही लोक हिवाळ्यामध्ये आवळे खाणे टाळतात. त्यांचा असा गोड गैरसमज आहे की, या हंगामात आवळे खाल्ल्याने सर्दी, ताप आणि खोकला या समस्या निर्माण होतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या हंगामात आवळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन बी यासारखी पोषक घटक असतात. जे आपल्याला हंगामी रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात देखील तुम्ही कच्चा किंवा आवळ्याचा रस तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता.
आवळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात आणि तुमची त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. यामुळे आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करा.
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. आवळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. आवळ्याचा रस प्यायल्याने सर्दी, अल्सर आणि पोटातील संसर्गाचा धोका कमी होतो.
आवळा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -