Tuesday, April 23, 2024
Homenewsसोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण


सराफा बाजारात आज गुरुवारी (दि.२६) सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold Price Today) आणि चांदी दरात घसरण झाली. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी २४ कॅरेट सोने (Gold Price Today) १५४ रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,२९४ रुपयांवर आला. तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ७६ रुपयांची घसरण झाली.


इंडियन बुलियन अँड ज्लेवर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,२९४ रुपये होता. तर २३ कॅरेट सोने ४७,१०५ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,३२१ रुपये, १८ कॅरेट सोने ३५,४७१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २७,६६७ रुपये एवढा होता.


चांदीचा दर ९० रुपयांनी कमी झाला असून प्रति किलो दर ६३,३०६ रुपये होता.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एमसीक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम मागे ५६,१९१ रुपयांवर पोहोचला होता. गेल्या वर्षीच्या सोन्याच्या दराचा विचार केल्यास सध्याचा दर हा २५ टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान, दिवाळीत सोने ५० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५५५ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,३६५ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,५६० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,६६६ रुपये एवढा होता.


शुद्ध सोने कसे ओळखाल?
२४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने असते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -