Thursday, May 16, 2024
Homeतंत्रज्ञान10 हजारांच्या आत फीचर्स दमदार; कॅमेरा पण जोरदार, बजेट स्मार्टफोन पाहिलेत का?

10 हजारांच्या आत फीचर्स दमदार; कॅमेरा पण जोरदार, बजेट स्मार्टफोन पाहिलेत का?

 

10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? तर या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या ब्रँडचे स्मार्टफोन खरेदी करता येतील. 5जी स्मार्टफोनमध्ये सर्व प्रकारचे फीचर मिळतील. कॅमेरा आणि बॅटरी पण दमदार मिळेल, कोणते आहेत हे बजेट स्मार्टफोन?

 

Realme C53 Price हा हँडसेट 6GB/128GB व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल. या स्मार्टफोनमध्ये युझर्सला 108MP प्रायमरी कॅमरा, 5000mAh बॅटरी आणि 6.74 इंच एचडी डिस्प्ले मिळेल.

 

Motorola G32 Price चा विचार करता हा 8GB/128GB व्हेरिएंटचा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना विक्री होत आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6.5 इंचाची फुल-एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

 

Poco M6 Pro 5G Price चा विचार करता हा 4GB/128GB व्हेरिएंटचा स्मार्टफोन 9,999 रुपयांना मिळेल. या हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 प्रोसेसर, 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 6.7 इंच फुल-एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

 

Nokia G42 5G मध्ये 2 जीबी व्हर्च्युअल रॅम, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5जी प्रोसेसर देण्यात आले आहे. किंमतीचा विचार करता 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी आहे.

 

itel P55 5G Price वर नजर टाकता 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. पण बँकेच्या सवलतीनंतर तुम्हाला हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. या फोनमध्ये 6GB पर्यंतची व्हर्चुअल रॅम मिळते. याशिवाय हा हँडसेट 2 वर्षांच्या गॅरंटीसह मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -