इचलकरंजी ; अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास कारवास
दोन अल्पवयीन बालिकांवर बळजबरी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी येथीली जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. नेरलेकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले) येथील सुनिल बाळू बुडके याला ८ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अॅड. एच. एन. मोहिते-पाटील यांनी कामपाहिले.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, आरोपी सुनिल बुडके चंदूर ता. हातकणंगले येथे एकटाच राहण्यास आहे. २६ जून २०१६ रोजी वृध्दाची सहा वर्षाची नात व तिची मैत्रीण अशा दोघीजणी घरासमोर खेळत होत्या. आरोपी बुडके याने या दोन्ही अल्पवयीन मुलींना आपल्या घरात बोलावूनघेतले आणि त्यांच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचारकेले. या प्रकरणी अल्पयवीन मुलीच्या आजीने शिवाजीनगरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सुनिल बुडके याच्यावर भादंवि कलम ३७६ व लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कलम २०१२ अन्वये कलम ४, ८, व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करुन सहाय्यक पोलिस निरिक्षक वाय. आर. खाडे यांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पिडीत मुली, वैद्यकिय अधिकारी, मुलींचा जबाब नोंदविणाऱ्या सपोनि प्रज्ञा देशमुख, तपासी अधिकारी सपोनि वाय. आर. खाडे, पोऊनि आर. एस. हातीगोटे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
सरकार पक्षातर्फे अॅड. एच. एन. मोहिते-पाटील यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने बुडके याला भादंवि कलम ३७६ व पोक्सो कायद्याचे कलम ४ प्रमाणे प्रत्येकी ८ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो कलम ८ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ८ दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो १२ कायद्याचे कलम १२ प्रमाणे १ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न दिल्यास २ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षासुनावली.