Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रझोमॅटोचा झटका, ऑनलाइन जेवणाची ऑर्डर महागली, ही सर्व्हीस केली बंद

झोमॅटोचा झटका, ऑनलाइन जेवणाची ऑर्डर महागली, ही सर्व्हीस केली बंद

सध्या ऑनलाइनचा (Online Food) जमाना आहे. कोणतीही गोष्ट घरपोच मिळू लागली आहे. झोमॅटो अ्न स्विगी या प्लॅटफॉर्मने तर खवय्यांसाठी कमालीची कामगिरी केली आहे. त्यांनी घरबसल्या अनेक हॉटेलचे जेवण मागवण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यानंतर ”तर कर झोमॅटोवर ऑर्डर…” हा शब्द युवा पिढीत लोकप्रिय झाला. परंतु आता झोमॅटोने एक धक्का देणारा निर्णय घेतला आहे. तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वी झोमॅटोकडून युजर्सला धक्का दिला गेला आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर शुल्क वाढवले आहेत. तब्बल 25 टक्के ही वाढ करण्यात आली आहे.

 

प्लॅटफॉर्म शुल्क 25% वाढवले

ऑनलाइन फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने प्लॅटफार्म शुल्कात 25 टक्के वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म शुल्क हे फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांकडून घेतात. कंपनीच्या या निर्णयानंतर ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देणे महाग होणार आहे. आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरच्या मागे पाच रुपये जास्त द्यावे लागणार आहे.

 

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क लागू केले होते. त्यानंतर त्याचे अधिक नफा मिळविण्यासाठी हे शुल्क 2 रुपये वरून 3 रुपये करण्यात आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, 2024 च्या सुरुवातीच्या सुरुवातीला झोमॅटोने त्याचे अनिवार्य प्लॅटफॉर्म शुल्क प्रति ऑर्डर 3 रुपये वरून 4 रुपये केले होते. आता तीन महिन्यांत त्यात वाढ करण्यात आली. आता हे शुल्क 25% वाढवून 5 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आले आहे.

 

झोमॅटोची ही सर्व्हीस बंद

प्लॅटफॉर्म शुल्कात 25 वाढ केल्यानंतर इंटर-सिटी फूड डिलीव्हरी सर्विस इंटरसिटी लीजेंड्स (Zomato Intercity Legends) बंद करण्यात आली आहे. कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी हे दोन महत्वाचे बदल कंपनीकडून घेण्यात आले आहे. झोमॅटो अ‍ॅपवर एक संदेश देण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की, ‘कृपया आमच्यासोबत राहा. आम्ही लवकरच परत येऊ’

 

देशात झोमॅटोवरुन वर्षाला जवळपास 85-90 कोटींच्या ऑर्डर दिल्या जातात. डिसेंबरच्या तीन महिन्यांत कंपनीचा महसूल 30 वाढला होता. त्यानंतर सातत्याने झोमॅटोचे शेअरचे दर वाढत आहेत. सोमवारी झोमॅटोने दर वाढवल्यानंतर शेअरमध्ये 5 वाढ झाली होती. कंपनीचे शेअर वर्षभरातील सर्वाधिक उच्चांक 197.70 रुपयांवर पोहचले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -