Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाराजस्थान-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, पलटण पहिल्या पराभवाचा वचपा घेणार?

राजस्थान-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, पलटण पहिल्या पराभवाचा वचपा घेणार?

17 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना होणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं आणि संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी उभयसंघात 1 एप्रिलला सामना झाला होता.तेव्हा राजस्थानने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे मुंबईचा 22 एप्रिलला 21 दिवसांनी पराभवाचा हिशोब क्लिअर करण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात 1 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना झाला होता. तेव्हा राजस्थानने मुंबईला 20 ओव्हरमध्ये 125 धावांवर रोखलं. त्यानंतर राजस्थानने विजयासाठी मिळालेलं 126 धावांचं आव्हान हे 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानचा वेगवान बॉलर ट्रेंट बोल्ट हा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याने मुंबई विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांसमोर ट्रेंट बोल्टच्या धारदार बॉलिंगचा सामना करण्याचं आव्हान असणार आहे.

 

नंबर 1 विरुद्ध नंबर 7

दरम्यान राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे. राजस्थान आणि मुंबईचा 22 एप्रिल रोजी या हंगामातील आठवा सामना असणार आहे. राजस्थानने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर मुंबईने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई नंबर 1 टीमचा धुरळा उडवणार की राजस्थान आपली विजयी घोडदौड कायम राखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर , युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

 

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -