Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानी गुंतवणूकदारांना अजून मालामाल करणार; इतक्या लाभांशाची केली घोषणा

मुकेश अंबानी गुंतवणूकदारांना अजून मालामाल करणार; इतक्या लाभांशाची केली घोषणा

मुकेश अंबानी यांच्या सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला 18,951 कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या आनंदात रिलायन्सने गुंतवणूकदारांना लाशांभ जाहीर केला आहे.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्याचा आकडा कमी असला तरी तो एकदमच निराशाजनक नक्कीच नाही. गेल्यावर्षी कंपनीला 19,299 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीला 1.80 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले.

 

नफा घसरला असला तरी एकत्रित महसूलात वार्षिक आधारावर वृद्धी नोंदविण्यात आली आहे. वार्षिक आधारावर 11.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. महसूल 2,40,715 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. गेल्यावर्षी समान तिमाहीत हा आकडा 2,16,265 कोटी रुपये होता.

 

Reliance ने अजून एक रेकॉर्ड नावावर केला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 10 लाख कोटींचा व्यवसाय केला. अशी करणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची उलाढाल 2.6 टक्क्यांनी वाढून म्हणजे 10 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

 

कंपनी गुंतवणूकदारांना 10 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देणार आहे. लाभांश हा प्रत्येक कंपनीच्या नफ्यातील हिस्सा असतो. तो, कंपन्या शेअरहोल्डर्समध्ये वाटते. कंपनी लवकरच वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजीत करणार आहे. त्यात लाभांशाची तारीख निश्चित करण्यात येईल. ज्याच्याकडे जास्त शेअर, तितका त्याला अधिक फायदा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -