Sunday, September 8, 2024
Homeक्रीडारोहित-यशस्वीची गळाभेट, हरुनही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीचं असेल समाधान

रोहित-यशस्वीची गळाभेट, हरुनही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीचं असेल समाधान

IPL 2024 मध्ये 22 एप्रिलची संध्याकाळ यशस्वी जैस्वालच्या नावावर. हा सामना त्याने गाजवला. त्याने शतक ठोकलं. विनिंग रन त्याच्या बॅटमधून निघाला. तो आपल्या टीमला विजयी करुनच डग आऊटमध्ये परतला. म्हणून यशस्वी जैस्वालच कौतुक कराव तेवढं कमी आहे. यशस्वी जैस्वालने 60 चेंडूंचा सामना करताना नाबाद 104 धावा फटकावल्या. IPL च्या इतिहासातील यशस्वी जैस्वालच हे दुसरं शतक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल शतकही यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्धच झळकावलं होतं.

IPL 2024 मध्ये पहिलं शतक झळकवल्यानंतर यशस्वी जैस्वाल बरच काही बोलला. त्यावेळी डोक्यामध्ये काय सुरु होतं? त्या बद्दलही यशस्वी व्यक्त झाला. शतकानंतर त्याने मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू रोहित शर्माची गळाभेट घेतली. यशस्वी जैस्वालने शतक ठोकून मॅच संपवली. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना रोहित शर्माची गळाभेट घेतली. इतकच नाही, रोहित आणि यशस्वीमध्ये चर्चा देखील झाली. असं म्हणतात, फोटो सर्वकाही सांगून जातो. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासोबतचा यशस्वी जैस्वालचा हा फोटोच सर्वकाही सांगून जातोय. पण याचा नेमका अर्थ काय? हे या दोन खेळाडूंनाच माहित असेल.

 

म्हणून रोहित शर्मा आनंदी असेल

 

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएल सीजनमधील हा पाचवा पराभव आहे. मुंबई इंडियन्सच्या या पराभवामुळे रोहित शर्माला निश्चित दु:ख झालं असेल. रोहितला बॅटने सुद्धा फार मोठ योगदान देता आलं नाही. (6) रन्सवर बोल्टने सॅमसनकरवी त्याला झेलबाद केले. टीम हरल्याची खंत रोहित शर्माच्या मनात नक्की असेल. पण टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याला यशस्वी जैस्वालच्या शतकाचा आनंद देखील झाला असेल.

यशस्वी जैस्वालचा रोल महत्त्वाचा

 

कारण IPL 2024 संपल्यानंतर लगेच वेस्ट इंडिज-अमेरिकेत T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या टीममध्ये यशस्वी जैस्वालचा रोल महत्त्वाचा असेल. टीममधला महत्त्वाचा खेळाडू फॉर्ममध्ये असल्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून टीम इंडियाचा कॅप्टन या नात्याने यशस्वीच्या शतकाने रोहित शर्माला आनंद झाला असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -