Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात जादा व्याजाच्या आमिषाने....

कोल्हापूर जिल्ह्यात जादा व्याजाच्या आमिषाने….

ताजी बातमी ऑनलाइन टीम


कोल्हापूर : जिल्ह्यात अधिक व्याजाच्या आमिषाने सामान्यांच्या ठेवी गोळा करणाऱ्या संस्थांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या संस्थांचे व्यवहार संशयास्पद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाही तर जादा व्याजाच्या आमिषा पोटी गोळा झालेली कोट्यवधीची गुंतवणूक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात जादा व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी गोळा करण्याचा सुरु उद्योग आहे. या योजनेच्या ठेवी गोळा करण्यासाठी मोठा पगार, आकर्षक लाभाचे प्रलोभन दाखवून तरूणांना जाळ्यात ओढले जाते. त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन ही लबाडाची टोळी माया जमवत असल्याचे समजते. ही टोळी ठेवी गोळा करताना नागरिकांना परव्या संदर्भातले विविध आमिषे दाखवत आहेत. त्यातीलच एक म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकी आधारे महिन्याला ८ टक्के या दराने वार्षिक ९८ टक्क्यांचा परतावा दिला जाईल, असे सांगून या ठेवी गोळा करत आहे. इतकच नाही तर लोकांचा विश्वास बसण्यासाठी काही महिन्याचे व्याजही धनादेशाव्दारे देत आहेत. हे धनादेश बाऊन्स होऊ नये म्हणून विशेष खबरदारही या टोळीकडून घेण्यात येत आहे.

सर्वसामान्य नागरिक नव्हे, तर समाजातील प्रतिष्ठित समजले जाणारे डॉक्टर्स, वकील, शिक्षक, प्राध्यापकही या आमिषाला बळी पडले आहेत. यातील काही जणांनी तर आपले व्यवसाय सोडून योजनेला गुंतवणूकदार मिळविण्याचा धंदा सुरू केला आहे आणि योजनेचे विपणन व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांची मर्सिडीससारख्या आलिशान गाड्यांतून फिरण्यापर्यंतही मजल गेली आहे.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) दबक्या आवाजात याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण आपल्या शासन व्यवस्थेला तक्रार असल्याशिवाय काही करता येत नाही. मोठी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार निराळ्याच चौकशीच्या भीतीने फिर्याद देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या लबाडांचे फावले आहे. एकूणच यावर जरब बसवण्यासाठी पुढाकार कोण घेणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. दरम्यान, या प्रकारामध्ये काही अतिदक्ष समजासेवकांनी लक्ष घातले. मात्र, लबाडांच्या म्होरक्याला जाऊन भेटल्यानंतर या समाजसेवकांचे हात ओले झाल्याने तेही तेथेच थांबले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -