Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रJio आणणार नवे प्लान्स, २५ एप्रिलला होणार लॉन्च; पाहा कोणाला होणार फायदा?

Jio आणणार नवे प्लान्स, २५ एप्रिलला होणार लॉन्च; पाहा कोणाला होणार फायदा?

आयपीएल सामन्यांचं जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रक्षेपण केलं जात आहेत. परंतु, आता जिओ (Jio) नवे अॅड फ्री प्लान्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या प्लान्सचा लाभ ज्या लोकांना जाहिरातीशिवाय आयपीएलचे सामने पाहायचे आहेत, त्यांना घेता येणार आहे. जिओने एक टीझर जारी करून याबाबत माहिती दिली. त्यानुसार JioCinema चे नवीन प्लॅन २५ एप्रिल २०२४ ला लॉन्च होणार आहेत.

पहिल्यापासून उपलब्ध ‘हे’ प्लान्स

 

सध्या जिओ सिनेमाने दोन प्लान्स आणले आहेत. जिओ सिनेमाचा मूळ प्लॅन ९९ रुपयांचा आहे, तर वार्षिक प्लॅन ९९९ रुपयांचा आहे. या प्लान्समध्ये युझर्सना हॉलीवूड कॉन्टेंटसह निवडक चित्रपट आणि शो पाहता येतात. या प्लानमध्ये यूजर्स एकावेळी चार डिव्हाईसेसवर ॲपचा वापर करू शकतात.

 

लॉन्च होऊ शकतात ‘हे’ प्लान्स

 

JioCinema च्या नवीन प्लान्सबद्दल जास्त तपशील उपलब्ध नसला तरी असा म्हटलं जातंय की ९९ रुपयांच्या मासिक प्लानमधून प्रीमियम प्लॅन लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय ८४ दिवसांचा प्लानही लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या JioCinema वर आयपीएल सामने मोफत दाखवले जात आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलच्या चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही. याचं कारण म्हणजे जिओ सिनेमावर आयपीएलचे सामने मोफतच पाहता येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -