Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंगमहाराष्ट्र दिनी सोने-चांदीची स्वस्ताईची मानवंदना; ग्राहकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र दिनी सोने-चांदीची स्वस्ताईची मानवंदना; ग्राहकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र दिनी सोने आणि चांदीने अनेपक्षितपणे स्वस्ताईची सलामी दिली. दोन्ही धातूंनी या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पण मोठा दिलासा दिला. दोन्ही धातूंमध्ये स्वस्ताई आल्याने आज सराफा बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची झळ बसण्याची कमी शक्यता आहे. मार्च महिन्यापासून सोने आणि चांदीने भाव वाढीची घौडदौड सुरु केली. एप्रिल महिन्या तर या बेशकिंमती धातूंनी धुमाकूळ घातला. किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या. या रॉकेट भरारीनंतर एप्रिलच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातू नरमले. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती

सोने नरमले

 

एप्रिलच्या अखेरच्या सत्रात सोने 2400 रुपयांनी स्वस्त झाले तर 1150 रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. तर 30 एप्रिल रोजी त्यात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 500 रुपयांची स्वस्ताई

 

एप्रिल महिन्याच्या अखेरच्या सत्रात चांदीत घसरण दिसली. मागील दोन आठवड्यात चांदीने माघार घेतली. गेल्या आठवड्यात चांदीने 2 हजारांची भरारी घेतली. तर 4500 रुपयांनी चांदी नरमली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या किंमती स्थिर होत्या. तर 30 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,710 रुपये, 23 कॅरेट 71,423 रुपये, 22 कॅरेट सोने 65,686 रुपये झाले. 18 कॅरेट 53,783 रुपये, 14 कॅरेट सोने 41,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,050 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

किंमती मिस्ड कॉलवर

 

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -