Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगसलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कोठडीतच घेतला होता गळफास

सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कोठडीतच घेतला होता गळफास

 

अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला होता.

 

अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता.

 

14 एप्रिल, रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता. बाईकवररून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या भुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते. मुंबई पोलिस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत त्या शूटर्सना शोधून काढले होते. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती.

 

चौघांना अटक

 

त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरू होताच. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींपैकीच अनुज थापन याने आज पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

 

ही बातमी अपडेट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -