ताजी बातमी ऑनलाइन टीम
निपाणी-राधानगरी मार्गावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता सोनगे (ता. कागल) येथे सोनगे येथील युवक टेम्पोच्या धडकेत जागीच ठार झाला. किरण अनंत वडेर (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, टेम्पो (नंबर एम. एच.१२ जे. एफ. ०९१९) चा चालक पांडुरंग दगडू पाटील (रा. कासारपुतळे) हा निपाणीकडून भाजीपाला घेऊन कसबा तारळेकडे जात होता.
टेम्पोचा ताबा सुटल्यामुळे टेम्पोने किरणला जोराची धडक देऊन सुमारे पन्नास फूट फरफटत नेले. घटनेची माहिती पोलीस पाटील सतीश तिराळे यांनी मुरगूड पोलीस स्टेशनला तत्काळ कळवली. मुरगूड पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.
कोल्हापूर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी आई वडिलांचा मृत्यू, आज मुलावरही अपघाताने काळाचा घाला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -