Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : बाथरूममध्ये शिरला म्हणून जीव वाचला : युवकावर हल्ला

इचलकरंजी : बाथरूममध्ये शिरला म्हणून जीव वाचला : युवकावर हल्ला

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

इचलकरंजीत काल सोमवारी आणखी एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये या युवकाने बाथरूम मध्ये जाऊन दार लावल्याने त्याचा जीव वाचला आहे. ही घटना इचलकरंजीतील जिजामाता मार्केट येथे घडली.

सुरज अशोककुमार राठी (वय 32 रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नांव आहे. या प्रकरणी प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव हे दोघेजण स्वत:हून पोलिसात हजर झाले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, नारायण पेठ परिसरात राहणारा सुरज राठी हा जिजामाता मार्केट परिसरातील मुलतानमल बाबुलाल अॅन्ड कंपनी या कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता. पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला, लाथा मारत सुरज याला खाली पाडले आणि कोयत्याने डोक्यावर वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने भेदरलेल्या सुरज याने जीव वाचविण्यासाठी समोरच असलेल्या बाबुलाल चोपडा यांच्या पेढीत शिरला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत पेढीत घुसले. त्याठिकाणी त्याच्यावर पुन्हा पुन्हा कोयत्याने वार केले. यावेळी वार चुकवत सुरज हा पेढीतील बाथरुमध्ये शिरला व त्याचा दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला सुरज याच्या डोक्यात दोन्ही हातांवर व खांद्यावर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता.

घटनास्थळीच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले. घटनास्थळी घड्याळ, अंगठी, कानातील बाली पडल्याचे पोलिसांना मिळून आले. नागरिकांनी सठी यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर संशयितांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर राहून कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -