Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्र१२ वी पास झालात, आता पुढील ऍडमिशनसाठी लवकर हे कागदपत्रे काढून घ्या...

१२ वी पास झालात, आता पुढील ऍडमिशनसाठी लवकर हे कागदपत्रे काढून घ्या …

मित्रांनो,नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आता विविध अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तत्पूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी जाताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

 

शिवाय अर्ज भरताना तो अचूक भरला जाईल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या ऍडमिशनसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून विद्यार्थी आत्तापासूनच त्या कागदपत्रांची जोड्या जुळवा करू लागतील व आईनं टायमाला त्यांना कोणताही कागदपत्रसाठी धावपळ करावी लागणार नाही.

 

 

पुढच्या ऍडमिशन साठी जे आपल्याला कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे जात / जमात प्रमाणपत्र (Caste / Tribe Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले), जात / जमात वैधता प्रमाणपत्र (Caste / Tribe Validity Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले). इ.१० वी व १२ वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. (मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत जात/जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात / जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.)

 

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांसाठीच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात/जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र (Non- Creamy Layer Certificate), राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही.

 

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate) व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार,उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) TFWS योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (EWS) प्रमाणपत्र: महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहीत केलेल्या प्रपत्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता वैध असलेले, सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

 

दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र (Person with Disability) आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले.सैन्य दलातील (Defence) संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.आधार क्रमांक व संलग्नित बैंक खाते शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.

 

वर्किंग प्रोफेशनल्सकरीता अनुभव प्रमाणपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र Working Professionals योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग / आस्थापना (केंद्र / राज्य) / खाजगी / सार्वजनिक मर्यादित कंपनी / एमएसएमई अशा ठिकाणी नियमितपणे १ वर्ष काम करीत असल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र. सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित आस्थापनेचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला लागणार आहे. ज्या त्या कॅटेगरीप्रमाणे आपली कागदपत्रे काढून ठेवणे गरजेचे आहे.

 

थोडक्यात तुम्हाला10th Mark sheet,12th Mark sheet, Leaving Certificate of 12th Class, Cast Certificate (if applicable), Non-Creamy layer(Only for OBC,SBC, V.J, NT-A,NT-B,NT-C Category), Cast Validity (Not for Open & EWS Category), Domicile & Nationality, Income Certificate, MHT-CET Result MH, Adhar Card, Passport Size Photo इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागेल.

 

अशाप्रकारे ही कागदपत्रे तुम्ही जमा करून ठेवा. जेणेकरून ऍडमिशनच्या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण भासणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -