Friday, March 14, 2025
Homeइचलकरंजीतारदाळच्या प्रियांका खोत यांच्या कामगिरीला वस्त्रनगरीचा सलाम

तारदाळच्या प्रियांका खोत यांच्या कामगिरीला वस्त्रनगरीचा सलाम

ताजी बातमी /ऑनलाईन टिम

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शहिद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी श्रीमती प्रियांका खोत यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंद पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांनी श्रीमती प्रियांका खोत यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबरोबरच श्रीमती प्रियांका यांच्या माध्यमातून शहीद जवान निलेश खोत यांची देशसेवा पूर्ण होईल, अशा शब्दात आमदार आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

सन 2022 मध्ये तारदाळ येथील जवान निलेश खोत हे देशसेवा बजावत असताना शहिद झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. मात्र त्यातून खचून न जाता वीरपत्नी प्रियांका खोत यांनी निलेश यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्मी जॉईन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी तयारीही सुरु केली आणि ध्येय व चिकाटीच्या बळावर त्यांनी आर्मीमध्ये प्रवेश केला. अवघ्या दीड वर्षात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.

 

या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांनी लेफ्टनंट श्रीमती प्रियांका खोत यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती कांता खोत, माधुरी खोत, चंद्रकांत चौगुले, यशवंत वाणी, कुमार खोत, राजाराम खोत, रणजित माने, सूर्यकांत जाधव, अमित खोत, विनायक देसाई उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -