Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगआज इंट्राडेमध्ये ‘या’ 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; मिळेल चांगला नफा

आज इंट्राडेमध्ये ‘या’ 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; मिळेल चांगला नफा

सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स(intraday) सपाट बंद झाले. बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 19.89 अंकांनी अर्थात 0.03 टक्क्यांनी घसरून 75,390.50 वर आणि निफ्टी 24.60 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 22,932.50 वर आला.

 

भारतीय शेअर बाजाराने(intraday) आठवड्याची सुरुवात 23,039 च्या नवीन उच्चांकाने केली आणि बँकिंग काउंटरच्या नेतृत्वाखाली झालेल्या रॅलीने इंडेक्सने नवीन उच्चांक गाठल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. पण व्यवहाराच्या शेवटी प्रॉफिट बुकींगच्या दबावाने सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात गेले. अखेर निफ्टी 24.65 अंकांच्या घसरणीसह 22,932.45 वर बंद झाला.

 

 

बँकिंग व्यतिरिक्त रिअल्टी सेक्टरने चांगली कामगिरी केली. तर मीडिया आणि पॉवर स्टॉकला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी 50 इंडेक्सने विक्रमी पातळीवर बियरिश कँडल तयार केली आहे. आदित्य गग्गर यांना विश्वास आहे की निफ्टी 22,780 चा मजबूत सपोर्ट पुन्हा मिळवण्याची शक्यता आहे. तर 23,110 च्या पातळीवर त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

विप्रो (WIPRO)

ग्रासिम (GRASIM)

एसबीआय लाइफ (SBILIFE)

ओएनजीसी (ONGC)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

आयडिया (IDEA)

पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

भारत फोर्ज (BHARATFORG)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -