Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी व परिसरात निकालाचे जुने स्क्रीन शॉट व एक्झिट पोल व्हायरल :...

इचलकरंजी व परिसरात निकालाचे जुने स्क्रीन शॉट व एक्झिट पोल व्हायरल : संभ्रम अवस्था वाढली

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अगदी काहीच तास बाकी असताना वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल चे तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे निवडणूक पोलचे अंदाज वर्तविले जात आहेत.

 

या सर्व पोलची आकडेवारी जसजशी पुढे येईल. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना ऊत येत आहे. अशातच आता इचलकरंजी आणि परिसरात काही मंडळी जुन्या निकालांचे स्क्रीन शॉट तसेच टीव्ही चॅनेल सोडून दाखवण्यात आलेले जुने स्क्रीन शॉट वायरल करताना दिसत आहेत.

 

तर काहींनी हेच स्क्रीन शॉट अगदी स्टेटस म्हणून लावताना पाहायला मिळत आहे. यामुळे झालेल्या निवडणुकीच्या निकालापेक्षा जुना आणि नवा निकाल याबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

 

दरम्यान असे जरी असले तरी मंगळवारी याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -