Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीमोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, भव्यदिव्य शपथविधीला ‘या’ परदेशी पाहुण्यांची हजेरी

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, भव्यदिव्य शपथविधीला ‘या’ परदेशी पाहुण्यांची हजेरी

बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मालदीव, मॉरिशस आणि सेशेल्सच्या प्रमुखांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. अनेक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांना देखील या शपथविधीला आमंत्रित करण्यात आले आहे.

 

आजचा दिवस हा भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारसाठी खूप मोठा आहे. कारण नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आज 9 जून रोजी पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार आहेत. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गज आणि परदेशी पाहुणे हजेरी लावणार आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 8000 पाहुणे उपस्थित राहणार असून देशातील स्वच्छता कर्मचारी आणि मजूर देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ.मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -