जुलै महिना सुरू झाला आहे, तशी महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाकडून आजच्या हवामानाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) पुढील 24 तासांमध्ये आता विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विजा देखील कड कडणार आहेत. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळ आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणातही आज अनेक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे वादळाची देखील शक्यता आहे.
मुंबईबाबत सांगायचे झाले, तर मुंबईमध्ये पुढील 24 तासात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर अधून मधून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. आज मुंबईचे तापमान हे 35° c च्या आसपास राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. पावसासोबत (Weather Update) हवामान विभागाने वादळी वाऱ्याचा देखील इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असणार आहे. त्याचप्रमाणे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक हे पर्यटनाला जातात. परंतु सध्या पावसाचा वेग आणि वाऱ्याचा वेग दोन्ही जास्त प्रमाणत वाहत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे.