Saturday, September 7, 2024
Homeराजकीय घडामोडीदिवस बदलले… उद्धव ठाकरे देणार भाजपला महाधक्का, संभाजीनगरातच खिंडार; हे नेते करणार...

दिवस बदलले… उद्धव ठाकरे देणार भाजपला महाधक्का, संभाजीनगरातच खिंडार; हे नेते करणार ठाकरे गटात प्रवेश? 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट आता भाजपला छ. संभाजीनगरमध्ये मोठा धक्का देणार आहे.

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पिछेहाट झाली. महायुतीला संमिश्र यश मिळालं असलं तरी भाजपचे खासदार ९ वर आल्याने मोठा धक्का बसला. 2019 मध्ये भाजपाने 23 जागा जिंकल्या होत्या, मात्र आता तो आकडा ९ वर आल्याने लक्षणीय घट झाल्याचे दिसू आले. या पराभवामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आणि आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट आता भाजपला छ. संभाजीनगरमध्ये मोठा धक्का देणार आहे.

 

हे नेते करणार ठाकरे गटात प्रवेश

 

भारतीय जनता पक्षाचे सहा ते आठ नगरसेवक हे शिवसेनेच्या ( ठाकरे गट) आहेत. माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या सह सह ते आठ नगरसेवक शिवसेना प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे भाजपचे हे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

 

दहा वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपला एवढा मोठा धक्का बसत आहे. यापूर्वी मोदी लाटेमुळे भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत होती. भाजपकडूनही येणाऱ्यांना रेड कार्पेट टाकलं जात होतं. या काळात क्वचितच एखाद्या नेत्याने भाजपमधून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असेल. पण लोकसभा निवडणुकीच्या नुकताच लागलेल्या निकालात भाजपचं महाराष्ट्रात पानिपत झालं. देशपातळीवरही भाजपला चांगलं यश मिळालं नाही. त्यामुळे आता भाजपचे ग्रह फिरलेले दिसत आहेत. भाजपमध्येही फुटीचे वारे वाहू लागले आहेत. त्याचीच सुरुवात संभाजीनगरमधून होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फुटीला अत्यंत महत्त्व आलं आहे.

 

राजू शिंदे यांनी दिला दुजोरा

 

भाजप सोडत असल्याच्या वृत्ताला राजू शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. 5 ते 6 नगरसेवक सोबत घेऊन आम्ही भाजप सोडत आहोत. भाजप मध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत, असं शिंदे यांनी सांगितलं. ‘ मी महापौर, शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपने करावा. रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा प्रवेश होणार आहे, इतर नगरसेवकांची नावे आम्ही आत्ताच सांगणार नाही कारण त्यांच्यावर दबाव येईल.’

 

मला जर संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची संधी दिली तर नक्की लढवेन आणि जिंकून सुद्धा येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय शिरसाठ यांनी मंत्री व्हायचं असेल तर आत्ताच व्हावं नंतर जनता त्यांना संधी देणार नाही असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -