Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगबाबा वेंगा यांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली?

बाबा वेंगा यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली?

जगभरातील अनेक विंडोज युजर्सना त्यांचा संगणक वापरताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अचानक निळ्या स्क्रीनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे संगणक पुन्हा पुन्हा बंद होत आहे आणि रीस्टार्ट होत आहे.

CrowdStrike नावाच्या अँटी-व्हायरस कंपनीने नुकत्याच केलेल्या अपडेटमुळे ही समस्या उद्भवल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की, ही समस्या संध्याकाळी 6 च्या सुमारास सुरू झाली. मध्य युनायटेड स्टेट्समध्ये Azure सेवा वापरणाऱ्या काही ग्राहकांना सुरुवातीला समस्या आल्या आहेत.

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट X वर #CyberAttack हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण कंपनीने सायबर हल्ल्याचा दावा फेटाळला आहे. सोशल मीडियावर आणखी एक ट्रेंडही सुरू झाला आहे. बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वी 2024 साठी केलेली भविष्यवाणी खरी ठरत आहे.

2024 साठी बाबा वेंगाचे काय भाकित होते?

बाबा वेंगा हे एक अंध व्यक्ती होते. ते बल्गेरियन गूढवादी होते ज्यांनी अनेक गोष्टींची भविष्यवाणी करुन ठेवली आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या घटनांचं भाकीत देखील त्यांनी आधीच केलं होतं. आता त्यांचं 2024 सालाचे अंदाजही तितकेच खरे ठरताना दिसत आहे. त्यांनी भविष्यवाणी केली होती की, या वर्षात तांत्रिक आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होऊ शकते. ज्यात आज झालेली तांत्रिक आपत्ती खरी ठरताना दिसत आहे.

तांत्रिक आपत्तीबद्दल काय म्हटले होते?

बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये मोठी तांत्रिक आपत्ती येऊ शकते अशी भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये सायबर हल्ल्यांचा समावेश असू शकतो किंवा गंभीर पायाभूत प्रणालींमध्ये बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे व्यापक व्यत्यय येऊ शकतात. 2024 साठी बाबा वेंगा यांचे भाकीत जवळपास खरे ठरताना दिसत आहे.

जगभरात अनेक भविष्यवाणी करणार लोकं आहेत. त्यापैकी बल्गेरियन बाबा वेंगा खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक भाकीत आतापर्यंत खरे ठरले आहेत. ती आंधळी व्यक्ती होती. केवळ 12 वर्षांची असताना त्यांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांना दिव्य दृष्टी होती, त्यामुळे त्यांनी काही वर्षेच नव्हे तर सन ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -