Thursday, February 12, 2026
Homeराशी-भविष्यपुढचे २५१ दिवस शनीची कृपा! ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा, मान-सन्मान आणि...

पुढचे २५१ दिवस शनीची कृपा! ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा, मान-सन्मान आणि प्रसिद्धी

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते. जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनीदेवाची सदैव कृपा असते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा २५१ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.

 

२५४ दिवस तीन राशीधारकांसाठी खास (Saturn Transit)

मेष

 

कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे २५१ दिवस सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

 

सिंह

 

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. २५१ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

 

तूळ

 

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा २५१ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -