Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशकॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा

कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी साल 2024-25 चे बजेट सादर करताना कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. कर्करोगा सारख्या दुर्धर आजारावरील महागड्या उपचाराने सर्वसामान्यांचे कंबरडे खर्चाने मोडत असते. या त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल केला आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवर सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल यांचा समावेश आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तीन अतिरिक्त कॅन्सर वरील औषधांवरील कस्टम ड्यूटी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन औषधांवर कस्टम ड्यूटी कमी केल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे

 

कॅन्सर उपचारांची उपकरणे स्वस्त होणार

कॅन्सरवरील उपचार करणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. मेडीकल एक्स रे मशिनमध्ये बसविण्यात येणाऱ्या एक्स- रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर फेस मॅन्युफक्टरींग प्रोग्रॅम बोलस्टर डोमेस्टीक प्रोडक्शन कॅपेसिटी अंतर्गत बेसिक कस्टम ड्यूटी ( BCD ) कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवीन उपक्रमांना पाठबळ दे्ण्यासाठी केलेले आहेत. तसेच आरोग्यसेवा परवडणारी करण्यासाठी आणि सुलभ करण्याच्या केंद्र सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -