Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगवर्षाला 10 लाख कमाई; तरीही 1 रूपयांचा आयकर भरण्याची गरज नाही, New...

वर्षाला 10 लाख कमाई; तरीही 1 रूपयांचा आयकर भरण्याची गरज नाही, New Tax Slab मध्ये आता किती वाचेल पैसा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्‍यांनी नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) सवलतीची घोषणा केली. टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला. त्यांनी मानक वजावटीत (Standard Deduction) वाढ केली. 50,000 रुपयांहून ही मर्यादा 75,000 रुपये केली. अर्थात देशातील करदात्यांना 5 लाख रुपयांपर्यंत कर मुक्त उत्पन्नाची आशा होती. त्याबाबत कोणताही मोठा निर्णय केंद्राने घेतला नाही. जुन्या कर प्रणालीला तर केंद्र सरकारने जणू वाळीत टाकले. त्यामुळे एक नाराजी करदात्यांमध्ये आहे. तरीही एक चमत्कार झालेला आहे. 7.75 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना एक रुपया पण कर द्यावा लागणार नाही. दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर अशी कर बचत करता येऊ शकते.

 

10 लाखांच्या कमाई नका भरु आयकर

 

जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही कर बचत करु इच्छित असाल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली न अवलंबिता जुनी कर व्यवस्था निवडावी लागेल. त्यातंर्गत अनेक सवलतीचा दावा करता येईल. जर तुम्ही कर सवलतीचा दावा करत नसाल तर ओल्ड टॅक्स रिझिम अंतर्गत तुम्हाला 20 टक्के कर द्यावा लागेल. पण जर तुम्ही कर सवलतींवर दावा कराल तर 10 लाखंच्या कमाईवर कर बचत करता येईल.

 

असा वाचवा कर

 

1. जुन्या कर प्रणालीत मानक वजावटीचे 50 हजार रुपये वाचतात. 9.50 लाख रुपयांचा कर द्यावा लागेल.

 

2. पीपीएफ, ईपीएफ, ईएलएसएस, एनएससी सारख्या गुंतवणुकीवर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाखांची कर बचत होईल. आता 8 लाख रुपयांवर कर द्यावा लागेल.

 

3. नॅशनल पेमेंट सिस्टममध्ये (NPS) वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास कलम 80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपये कर सवलत मिळेल. आता 7.50 लाखांवर कर द्यावा लागेल.

 

4. जर गृहकर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजावर आयकर खात्याच्या कलम 24B अंतर्गत 2 लाखांची बचत करता येईल. आता 5.50 लाखांवर कर द्यावा लागेल.

 

5. आयकर अधिनियम कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यातंर्गत 25 हजार रुपयांपर्यंत बचत होईल. पण त्यात पती,पत्नी आणि मुलांचे नाव असणे आवश्यक आहे. तर आई-वडिलांच्या आरोग्य विमा खरेदीवर 50 हजारांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळते.

 

6. 5.50 लाखातून 75 हजार रुपये वजा केल्यास 4.75 लाखांवर कर द्यावा लागेल. जुन्या कर रचनेत 5 लाख रुपयांचा स्लॅब असल्याने तुम्हाला 10 लाखांवर एकही रुपया कर द्यावा लागणार नाही.

 

नवीन कर प्रणालीत किती द्यावा लागेल 10 लाखांवर कर

 

निर्मला सीतारमण यांनी नवीन टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे. तरीही 10 लाख रुपयांच्या कमाईवर कर द्यावा लागेल. नवीन कर प्रणालीत मानक वजावटीची मर्यादा 75 हजार रुपये करण्यात आली आहे. म्हणजे कर पात्र उत्पन्न 9 लाख 25 हजार रुपये झाले आहे. आता करदात्यांना 52,500 रुपयांऐवजी 42,500 रुपये कर द्यावे लागेल. म्हणजे 10 लाखांवर या नवीन कर प्रणालीत 10 हजारांची बचत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -