Wednesday, March 12, 2025
Homeराशी-भविष्यतब्बल १८ वर्षानंतर भारतासह ‘या’ देशांमध्ये दिसणार शनी चंद्रग्रहण; आजच आहे योग,...

तब्बल १८ वर्षानंतर भारतासह ‘या’ देशांमध्ये दिसणार शनी चंद्रग्रहण; आजच आहे योग, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. त्यात शनीलाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता ग्रह, असं म्हटलं जातं. पण, आता तब्ब्ल १८ वर्षांनंतर एक दुर्मीळ योग जुळून येत आहे. भारतात २४ व २५ जुलैच्या मध्यरात्री शनी चंद्रग्रहण दिसणार आहे.

या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार असून, चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. खगोलशास्त्रीय संशोधक या अद्भुत योगासंबंधीचं संशोधन करीत आहेत.

केव्हा दिसणार शनी चंद्रगग्रहण (Shani Chandra Grahan)
खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार २४ जुलै रोजी रात्री ०१:३० वाजता आकाशात हे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. रात्री ०१ वाजून ४४ मिनिटांनी शनी चंद्राच्या मागे लपणार असल्यानं चंद्र त्याला संपूर्णतया झाकून टाकणार आहे. तसेच रात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी शनी ग्रह चंद्राच्या कक्षेतून बाहेर निघताना दिसेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

भारतासह ‘या’ देशांत शनी चंद्रग्रहण दर्शन
हे शनी चंद्रग्रहण भारताबरोबरच चीन, श्रीलंका, जपान व म्यानमार या देशांमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. शनीच्या चंद्रग्रहणाच्या या घटनेला ‘लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न’ (Lunar occultation of Saturn) असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीनं चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. त्यामध्ये सर्वांत आधी शनीचे वलय स्पष्टपणे दिसते. हा अद्भुत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार औत्सुक्याचा विषय आहे. शनी चंद्रग्रहण हे फक्त फक्त दुर्बिणीने दिसू शकतं.

ऑक्टोबरमध्ये पुन्हा दिसणार हे दृश्य
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांनंतर शनी चंद्रग्रहण पुन्हा भारतात दिसणार आहे. तसेच, खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार जर काही कारणांमुळे जुलै महिन्यात हे चंद्रग्रहण दिसलं नाही, तर १४ ऑक्टोबरला हे चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -