Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंगचांदीत रेकॉर्डब्रेक घसरण, सोन्यात स्वस्ताई, खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, असा आहे...

चांदीत रेकॉर्डब्रेक घसरण, सोन्यात स्वस्ताई, खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, असा आहे भाव

सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. चांदीत तर या तीन दिवसांत विक्रमी घसरण झाली. सोन्याने पण सलग दहा दिवसांत कोणतेही आगेकूच केलेली नाही. बजेटच्या कालावधीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मौल्यवान धातूच्या किंमतीत कोणतेही मोठी वाढ झाली नाही. सीमा शुल्क कपातीचा मोठा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला. ग्राहकांना सध्या स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आहे. काय आहेत आता या धातूच्या किंमती?

सोन्यात आली स्वस्ताई

18 जुलैपासून सोन्यात स्वस्ताई आहे. जवळपास दहा दिवसांत दरवाढ नोंदवलेली नाही. या आठवड्यात 22 जुलैला सोने 120 रुपयांनी तर 23 जुलैला 300 रुपयांनी स्वस्त झाले. 25 जुलै रोजी त्यात 100 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळच्या सत्रात सोने स्वस्ताईचा डंका वाजवत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 7 हजारांची घसरण

या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी झेप घेतली होती. सोमवारी किंमती स्थिर होत्या. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी घसरली. 24 जुलै रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीने पांढरे निशाण फडकावले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,227, 23 कॅरेट 67,954, 22 कॅरेट सोने 62,496 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,170 रुपये, 14 कॅरेट सोने 39,913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,474 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -