Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आजही पावसाचे संकट कायम; ‘या’ विभागांना दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात आजही पावसाचे संकट कायम; ‘या’ विभागांना दिला सतर्कतेचा इशारा

गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभाग देखील रोजचा पावसाचा (Weather Update) अंदाज देत आहे. जेणेकरून नागरिकांना आधीच काळजी घेऊन खबरदारी घेता येईल. पुण्यात देखील गेल्या चार दिवसापासून चांगलाच पाऊस चालू आहे. अनेक नागरिकांची गैरसोय देखील झालेली आहे.

अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 27 जुलै रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आजही मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने पुण्यातील घाट माथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जे लोक वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत आहे. त्यांनी अत्यंत काळजी घेऊन निसर्गाचा आनंद आनंद घ्यायचा आहे.

त्याचप्रमाणे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज अति मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या विभागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

 

कोकणासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी देखील हा एक धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

 

साताऱ्यातील घाटात देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात देखील आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे

 

या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Update) तर पडणारच आहे. परंतु त्यासोबतच सोसाट्याचा वारा देखील वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मात्र चांगलाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -