Wednesday, October 30, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: पूर ओसरला... आता साथीच्या आजारांचा धोखा

कोल्हापूर: पूर ओसरला… आता साथीच्या आजारांचा धोखा

पंचगंगेला आलेला पूर ओसरत असला, तरी साथीच्या आजाराचे संकट आता समोर आले आहे. पूरग्रस्त भागातील दलदल, अनेक ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये साचलेले सांडपाणी यामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे.

 

पूरग्रस्त भागात महापालिकेने चिखल काढून तेथे पाणी आणि औषधाची फवारणी केली असली, तरी साचून राहिलेले पाणी आणि कचरा हा आजाराला निमंत्रण देऊ शकतो अशी स्थिती आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाणीची गुणवत्ता घटल्याने पोटविकारांसह अन्य आजारांचा धोका कायम आहे. डासांचा डंखही तीव- झाला असून जिल्ह्यात जुलै महिन्यात 586 डेंग्यूचे, तर 108 चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. हे प्रमाण पाहता येणार्‍या काळात नागरिकांना सावध राहावे लागणार आहे.

 

पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची मोठी भीती असते. दूषित पाणी पिल्याने जुलाब, उलटी, टायफॉईड, गॅस्ट्रोसारखे आजार होण्याची भीती असते. विशेतः लहान मुले, गरोदरमाता, वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे येणारे काही दिवस पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

शहरालगत अस्वच्छतेचे साम्राज्य

 

कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागालाही पुराचा फटका बसला. पुराचे पाणी साचून राहिले. कोल्हापूर शहरात ज्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकने स्वच्छता मोहीम राबवली तशी कोणतीही व्यवस्था पूर आलेल्या ग्रामीण भागात नसल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजाराचा गंभीर धोका आहे. शहर आणि ग्रामीण भाग यातील सीमारेषा एवढी पुसट आहे की, या भागातून आजारांचे प्रमाण वाढल्यास त्याचा शहरी भागाला फटका बसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -